पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकच्या पुन्हा उलट्या बोंबा, भारतीय लष्कराचा दावा फेटाळला

नियंत्रण रेषेवर सध्या तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानच्या लष्कराला हे मृतदेह घेऊन जाण्याचा प्रस्तावाला पाकने उत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये घुसकोरी करणाऱ्या ५ ते ७ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा भारताचा दावा पाकिस्तानी लष्कराने फेटाळून लावला आहे.  पाकिस्तानी सेना प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय दावा फेटाळून लावला असून काश्मीरमधील परिस्थिती दुर्लक्षित करण्यासाठी भारताकडून या गोष्टी पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे. 

पाक लष्कराशिवाय पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानेही भारताचा दावा फेटाळून लावला आहे. जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाककडून करण्यात आलेली घुसघोरीचा भारताचा आरोप अमान्य असून मृतदेह घेऊन जाण्याचा प्रस्ताव फेटाळत आहोत, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

भारतीय सैन्याने पाकला म्हटले, पांढरे निशाण घेऊन या, मृतदेह घेऊन जा

भारतीय सैन्यदलाच्या कारवाईत खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अजूनही नियंत्रण रेषेवर आहेत. भारतीय सैन्यदलाने पाक लष्कराला हे मृतदेह घेऊन जाण्याचा प्रस्ताव दिला होता. पाकिस्तानने पांढरे निशाण घेऊन यावे आणि आपल्या लोकांचे मृतदेह घेऊन जावे, असे भारताने म्हटले होते. जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील एका सीमा चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तान बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडताना  ५ ते ७ घुसखोरांचा खात्मा केला होता.