पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय सैन्याने पाकला म्हटले, पांढरे निशाण घेऊन या, मृतदेह घेऊन जा

भारतीय सैन्याने पाकला म्हटले, पांढरे निशाण घेऊन या, मृतदेह घेऊन जा (संग्रहित छायाचित्र)

भारतीय सैन्यदलाच्या कारवाईत मारल्या गेलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह अजूनही नियंत्रण रेषेवर आहेत. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानच्या लष्कराला हे मृतदेह घेऊन जाण्याचा प्रस्ताव दिला आहे. पाकिस्तानने पांढरे निशाण घेऊन यावे आणि आपल्या लोकांचे मृतदेह घेऊन जावे, असे भारताने म्हटले आहे. परंतु, पाकिस्तानकडून याबाबत कोणतेच उत्तर आलेले नाही. जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील एका सीमा चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तान बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडताना  ५ ते ७ घुसखोरांना ठार मारले होते. 

काश्मीर: नियंत्रण रेषेवर पाककडून घुसखोरी, ७ जणांचा खात्मा

सीमा चौकीवर हल्ल्याचा प्रयत्न करत असलेल्या पाक सैनिकांचे आणि दहशतवाद्यांचे मृतदेह अजूनही नियंत्रण रेषेवर आहेत. पाकिस्तानला वाटल्यास ते पांढऱ्या झेंड्यासह येऊन हे मृतदेह अंतिम विधीसाठी नेऊ शकतात, असे भारताने म्हटले आहे.

भारतीय लष्कराने पुरावा म्हणून ४ मृतदेहांचे सॅटेलाईट छायाचित्र घेतले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून काश्मीरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते गोळीबाराच्या आड जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना भारतात घुसवत असल्याचे म्हटले.