पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : ... म्हणून गोळीबार थांबवून पाकिस्तानी सैनिकांनी दाखवला पांढरा झेंडा!

पाकिस्तानी सैन्याकडून पांढरा झेंडा दाखविण्यात आला

शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानकडून सातत्याने भारतीय सैनिकांच्या दिशेने गोळीबार करण्यात येतो. याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देतात. या आठवड्यात पाकिस्तानचे दोन सैनिक भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मारले गेले. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अखेर पाकिस्तानला पांढरा झेडा दाखवावा लागला. याचा एक व्हिडिओ एएनआयने प्रसारित केला आहे.

'उदयनराजेंवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या पवारांना काय मिळाले?'

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये हाजीपूर सेक्टरमध्ये १० आणि ११ तारखांच्या मध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तान सैन्याचे दोन सैनिक ठार झाले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून पांढरा झेंडा दाखवत प्रत्युत्तरादाखल केला जाणारा गोळीबार थांबविण्याची विनंती करण्यात आली. आपल्या सैनिकांचा मृतदेह घेऊन जाता यावा, यासाठी पाकिस्तानकडून पांढरा झेंडा दाखविण्यात आला होता. यानंतर लगेचच भारतीय जवानांनी गोळीबार थांबविला होता. 

भास्कर जाधव यांच्या शिवसेनाप्रवेशापूर्वी घडला हा भन्नाट किस्सा!

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय चौकांच्या दिशेने गोळीबार केला जातो. भारतीय जवान या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देतात. घुसखोरी करण्यासाठी दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठविण्यासाठीही पाकिस्तानकडून अशा पद्धतीने गोळीबार केला जातो.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:indian army killed two pakistani soldiers after that pak army showing white flag in hajipur sector jammu and kashmir