पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त, भारताचे चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त, भारताचे चोख प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यापासून चवताळलेला पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. भारतीय लष्कराने ही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. भारतीय लष्कराने शनिवारी जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरजवळ सीमेपलीकडील एक पाकिस्तानी चौकी उद्ध्वस्त केली. पाकिस्तानकडून सकाळी सुमारे साडेसहा वाजता शस्त्रसंधींचे उल्लंघन करण्यात आले होते. यात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने सीमारेषेजवळ आक्रमक हालचाली दिसत आहेत. पाककडून सीमीरेषा अशांत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच क्रमात भारतीय सैन्याने गुरुवारी रात्री केरन सेक्टरमध्ये पाकच्या सीमेतून घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडला होता. नुकताच भारतीय लष्कराने पाकिस्तानचे असेच एक दुःसाहस हाणून पाडला होता. यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला होता. पण पाकिस्तानने केवळ ४ सैन्य ठार झाल्याचे कबूल केले होते. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indian Army hit Pakistan post in rajouri sector Indian soldier was martyred in ceasefire violation