सीमा रेषेवर दुःसाहस करणाऱ्या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी सकाळी पाकिस्तान सैन्याकडून झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले होते. त्याला उत्तर देताना भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळ नष्ट केले आहेत. यात पाकिस्तानचे किमान ५ सैनिक ठार तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. सध्या त्या ठिकाणांवर उखळी तोफांचा मारा सुरुच आहे.
भारतीय लष्कराने पीओकेत धडक कारवाई करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पीओकेतील तंगधार सेक्टर परिसरात ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तान लष्कर या तळाचा वापर दहशतवाद्यांना भारतीय सीमेत पाठवण्यासाठी करत होते. उखळी तोफांच्या माध्यमातून हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. 'एएनआय'ने या संबंधीचे वृत्त दिले आहे.
Indian army has used artillery guns to target the terrorist camps which have been actively trying to push terrorists into Indian territory. https://t.co/MHfOLqbYUr
— ANI (@ANI) October 20, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने चिथावणी दिल्यानंतर भारतीय लष्कराने शेजारील देशाला योग्य उत्तर दिले. यात पीओकेत उखळी तोफांचा मारा केला जात आहे. या हल्ल्यात पीओकेस्थित दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले आहेत. या तळांवरुन दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याची तयारी करण्यात येत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने नीलम खोऱ्यातील (पीओके) चार दहशतवादी तळ नष्ट केले आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानचे किमान ५ जवान ठार झाले आहेत.