पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ISIचे भारतीय अधिकाऱ्यांच्या WhatsAppवर लक्ष, लष्कराचा सावध राहण्याचा इशारा

आयएसआयचे भारतीय अधिकाऱ्यांच्या WhatsAppवर लक्ष, लष्कराचा सावध राहण्याचा इशारा

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांना व्हॉट्सअपचा सावधपणे वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. आयएसआय लष्करी अधिकाऱ्यांच्या प्रोफाइलचे निरीक्षण करत आहे. या पार्श्वभूमीवर लष्कराचे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअप काळजीपूर्वक वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मोठ्या व्हॉट्सअप समूहातून त्वरीत बाहेर पडण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. सोशल मीडियावर कोणतीही माहिती पोस्ट करण्यापासून स्वतःला दूर ठेवा. गरज पडल्यास अधिकाऱ्यांनी आपल्या छोट्या व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून संपर्क करण्यास सुचवले आहे. 

तुमचं व्हॉट्स अ‍ॅप अपडेट करा कारण...

लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शत्रू देशाच्या गुप्तचर संस्था व्हॉट्सअप समूहांवर लक्ष ठेवून आहेत. ते लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुप्तचर संस्थांनी काही समूहात घुसखोरीही केली असून ते अधिकाऱ्यांच्या चर्चेवर लक्ष ठेवून आहेत.

तपासासाठी मोबाइल मागितले जाण्याची शक्यता

नातेवाईकांना सोशल मीडियावर लष्करी अधिकाऱ्यांशी निगडीत सर्व माहिती आणि वर्दीतील फोटो हटवण्यास सांगितले आहे. निर्देशांचे पालन केले आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांचे फोन ही मागितले जाण्याची शक्यता आहे.

आनंद सोडा, आता विधानसभेच्या कामाला लागाः फडणवीस

धमकीनंतर उचलण्यात आले पाऊल

नुकताच एका अधिकाऱ्याला एक संशयित मेल आला होता. जर त्याने मेलमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक केले नाहीतर त्याच्या मुलीचे व्हिडिओ सार्वजनिक केले जातील, अशी धमकी देण्यात आली होती. कॉम्प्यूटरवर मालवेअर इन्स्टॉल करण्यासाठी त्या अधिकाऱ्याला लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात आले होते.