पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर भूतानमध्ये कोसळले, दोन्ही वैमानिक मृत्युमुखी

याच ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले. (फोटो - एएनआय)

भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर शुक्रवारी भूतानमध्ये कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसारने या दुर्घटनेत दोन्ही वैमानिक मृत पावले आहेत.

हेलिकॉप्टर लष्करी कामासाठी अरुणाचल प्रदेशमधील खिरमू येथून भूतानमधील योंगफुल्ला येथे निघाले होते. मृतांमध्ये एक भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल श्रेणीच्या लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. तर भूतानमधील एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. भूतानमधील लष्करी अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.