पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेतील पहिल्या शीख पोलिस अधिकाऱ्याची हत्या

संदीपसिंग धालीवाल (Photo: Twitter/@HCSOTexas)

अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ह्यूस्टनमध्ये भारतीय वंशाचे शीख पोलिस अधिकारी संदीपसिंग धालीवाल यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. वर्ष २०१५ मध्ये संदीपसिंग यांनी इतिहास रचला होता. त्यांना कर्तव्यावर असताना पगडी परिधान करण्याची आणि दाढी राखण्यास परवानगी मिळाली होती. संदीपसिंग यांचे आता एक 'हिरो' म्हणून स्मरण केले जात आहे. मुलांमध्ये तू लोकप्रिय होते. सोशल मीडियावर आता त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करुन श्रद्धांजली वाहिली जात आहे. संदीपसिंग यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या ४७ वर्षीय रॉबर्ट सॉलिसला अटक करण्यात आली आहे. वंशभेदातून हल्ला होता का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार, एक नागरिक बंधक

संदीपसिंग यांची ह्यूस्टन येथे एका ट्रॅफिक सिग्नलवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ह्यूस्टन क्रॉनिकलने शेरिफ गोंजालेजच्या हवाल्याने सांगितले की, संदीपसिंग धालीवाल यांनी एक वाहन रोखले. त्या कारमध्ये एक महिला आणि पुरुष होता. वाहनातून एक व्यक्ती बाहेर आली आणि त्याने संदीपसिंग यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. संदीपसिंग यांना ३ मुले आहेत. 

संदीप हे फक्त टेक्सासच नव्हे तर अमेरिकेतील पहिले अधिकारी होते, ज्यांना पगडी परिधान करण्यासाठी आणि दाढी ठेवण्याची परवानगी मिळाली होती. संदीप हे नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत असत. समाजसेवेत ते अग्रेसर होते. २०१७ मध्ये मारिया या वादळावेळी प्युर्टो रिको येथील मदतकार्यांत हिरिरीने भाग घेतला होता. यासाठी त्यांचे मोठे कौतुकही करण्यात आले होते. 

नोकरी गेल्याने तणावात असलेल्या इंजिनिअरने कुटुंबियांना संपवून केली आत्महत्या

संदीपसिंग यांच्या हत्येमुळे स्थानिकांमध्ये रोष आहे. लोक रस्त्यावर उतरुन या अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहत आहेत.