पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 'वीरचक्र' पुरस्कार

अभिनंदन वर्थमान

भारतीय वायुदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना 'वीरचक्र पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वायुदलाचा स्क्वाड्रन लीडर मिन्टी अग्रवाल यांना 'युध्दसेवा पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.

हरयाणामध्ये गोळ्या झाडून पोलिस उपायुक्तांची आत्महत्या

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. त्यानंतर भारताच्या हवाई हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ- १६ विमानाचा पाठलाग करत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी ते पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांना वीरचक्र पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान, वीरचक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे. हा पुरस्कार जवानांच्या वीरता आणि बलिदानासाठी दिला जातो.

कलम ३७०: पाकिस्तानने युएनएससीकडे बैठकीची केली मागणी

दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-१६ पाडले. त्यानंतर आणखी एका लढाऊ विमानाचा पाठलाग करत असताना त्याचे विमान पाकिस्तानमध्ये पडले. त्यावेळी पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते. पाकिस्तानने ३ दिवस त्यांना कैद करुन ठेवले  होते. ६० तासानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली. त्यानंतर अटारी-वाघा सीमेवरुन अभिनंदन भारतात आले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. 

१५ ऑगस्टपर्यंत अजित डोवाल यांचा काश्मीर खोऱ्यात 'मुक्काम'