पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हवाई दलाचे लढाऊ विमान आसाममधून बेपत्ता

संग्रहित छायाचित्र

भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे लढाऊ विमान आसाममधून बेपत्ता झाले आहे. या विमानात ८ क्रू सदस्यांसह १३ जण प्रवास करत होते. हे विमान आसामवरुन अरुणाचल प्रदेशला जात होते. त्याचवेळी हे विमान बेपत्ता झाले. दुपारपासून बेपत्ता झालेल्या या लढाऊ विमानाचा कोणताही संपर्क होत नसल्याने हवाई दलाने त्याचा शोध सुरू केला आहे. 

आसामच्या जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशसाठी दुपारी १२.२५ वाजता विमानाने उड्डाण केले होते. या विमानाशी दुपारी १ वाजता अखेरचा संपर्क झाला होता. या विमानातून ८ क्रू मेंबर आणि पाच प्रवासी असे एकूण १३ जण प्रवास करत होते. एएन ३२ या मूळ रशियन बनावटीच्या विमानाचा हा तीन वर्षातील तिसरा अपघात आहे.  सुखोई-३० आणि सी १३० च्या माध्यमातून या बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात असल्याचे 'एएनआय'ने म्हटले आहे.