पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: वायुदलाकडून बालाकोट एअर स्ट्राईकचा प्रतीकात्मक व्हिडीओ जारी

बालाकोट एअर स्ट्रईक

भारतीय वायुदलाने बालाकोट एअरस्ट्राईकचा प्रतीकात्मक व्हिडीओ जारी केला आहे. पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. या बालाकोट एअर स्ट्राईकचा प्रतीकात्मक व्हिडीओ सरकारने शुक्रवारी जारी केला आहे. वायुदलाचे नवे प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी पत्रकार परिषद घेतली त्यापूर्वी हा व्हिडीओ दाखवण्यात आला.  

'शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत'

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. या घटनेनंतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. 

मेट्रो-३ कारशेडचा मार्ग मोकळा; सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या

या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी वायुदलाने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून २७ फेब्रुवारी २०१९ रोजी एअर स्ट्राईक करत बालाकोट येथील जैश-ए-मोहम्महदचे तळ उध्वस्त केले होते. या हल्ल्यासाठी मिराज-२००० लढाऊ विमानाचा वापर केला होता. 

पराग शहांच्या गाडीवर प्रकाश मेहतांच्या समर्थकांचा हल्ला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:indian air force showcases the story of the balakot aerial strikes in a promotional video