पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाककडून भारतीय हद्दीत घुसलेले विमान जबरदस्तीने जयपूरमध्ये उतरवले, IAF ची कामगिरी

जयपूरमध्ये उतरवलेले जॉर्जियाचे विमान

हवाई हद्द नियमांचे उल्लंघन करून पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून भारतीय हवाई हद्दीत घुसलेले जॉर्जियन विमान शुक्रवारी दुपारी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी जबरदस्तीने जयपूर विमानतळावर उतरविले. कराचीहून दिल्लीकडे निघालेले हे विमान त्याचा नियोजित हवाई मार्ग सोडून प्रवास करीत होते. विमान भारतीय हद्दीत प्रवेश करीत असल्याचे रडारच्या साह्याने कळल्यावर सुखोई एसयू ३० लढाऊ विमानांच्या साह्याने ते जयपूरमध्ये उतरविण्यात आले.

जॉर्जियन विमानाला अडविण्यासाठी जोधपूरमधून एक लढाऊ विमान पाठविण्यात आले, तर दुसरे बरैलीहून पाठविण्यात आले होते. टबिलिसीहून निघालेल्या या विमानाकडे हवाई प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आहेत. 

या विमानाच्या वैमानिकांनी मुंबई आणि अहमदाबाद येथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असणे आवश्यक होते. पण विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यानंतर भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्यामुळे हवाई दलाच्या विमानांना तिथे पाठविण्यात आले.

उत्तर गुजरातमधील अनियोजित मार्गावरून हे विमान भारतीय हवाई हद्दीत घुसले. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी यशस्वीपणे त्याला गाठले आणि जबरदस्तीने जयपूर विमानतळावर उतरविण्यास भाग पाडले, असे भारतीय हवाई दलाच्या निवेदनात म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indian Air Force fighter jets force cargo plane coming from Pakistani Air space to land at Jaipur airport