भारतीय तपास संस्था कोणत्या ना कोणत्या कायद्याद्वारे मला गोवण्याच्या प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या राजकीय गुरुंच्या सांगण्यावरूनच तपास संस्थातील अधिकारी हे सर्व करीत आहेत, असा आरोप वादग्रस्त धर्म प्रचारक झाकीर नाईक याने केला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर झाकीर नाईक याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठीही सक्तवसुली संचालनालय प्रयत्नशील आहे.
रेल्वे पोलिसांचा उद्दामपणा; पत्रकाराला मारहाण, तोंडावर लघुशंका
एका निवेदनात झाकीर नाईक याने म्हटले आहे की, मला ताब्यात घेण्यासाठी भारतातील तपास संस्था इतक्या उतावीळ का झाल्या आहेत. या तपास संस्थांच्या राजकीय गुरुंच्या सांगण्यावरूनच त्याचे अधिकारी हे सर्व करीत आहेत. माझ्यावर नक्की कोणत्या कलमांद्वारे गुन्हा दाखल करायचे, याबद्दल तपास संस्थांतील अधिकाऱ्यांमध्येच एकमत नाही. आधी त्यांचा रोख दहशतवादी कारवायांच्या दिशेने होता. पण आता तो आर्थिक गैरव्यवहाराकडे वळला आहे.
मला न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जात नाही, तोपर्यंत मला अटक करण्यात येणार नाही, असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाकडून दिले जात असेल, तर मी भारतात यायला तयार आहे. मी आजच्या आज भारतात परतेन, असे झाकीर नाईकने म्हटले आहे.
'मदरशांमधून गोडसे, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे लोक बाहेर पडत नाही'
झाकीर नाईक सध्या मलेशियात आहे. भारतीय तपास संस्थांनी लावलेल्या आरोपातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी झाकीर नाईक प्रयत्नशील आहे. भारतीय तपास संस्थांकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्याने म्हटले आहे.