पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsAUS फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन PM अन् मोदींच्यात रंगला सामना

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि भारतीय पंतप्रधान यांच्यात ट्विटर रंगला सामना

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषकातील फायनलपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात शाब्दिक सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. जागतिक महिला दिनाच्या दिवशी मेलबर्नच्या मैदानात भारतीय महिला संघ आणि यजमान ऑस्ट्रेलियन यांच्यात लढत रंगणार आहे. 

ICC W T20 WC Final: ऐतिहासिक 'फाइट'साठी असा असेल भारतीय संघ

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील फायनलच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, एमजीसीच्या मैदानात उद्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील तगड्या दोन संघाचा खेळ पाहण्यासाठी स्टेडियमवर मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळेल. सर्वत्र ऑस्ट्रेलिया बोलबाला दिसेल. या ट्विटमध्ये स्कॉट मॉरिसन यांनी मोदींना टॅग केले आहे.यावर मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय महिला ज्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील त्यावेळी मेलबर्न स्टेडियम निळ्या रंगांनी (भारतीय संघाच्या जर्सीचा रंग) बहरल्याचे दिसेल, असे प्रत्त्युतर मोदींनी दिले आहे.

स्थानिक क्रिकेटच्या बादशहाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की, मॉरिसन, टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत होणे यापेक्षा चांगली गोष्ट कोणतीही असू शकत नाही. ऑस्ट्रेलियन महिला संघाला महिला दिनाच्या शुभेच्छा! जो संघ चांगली कामगिरी करेल, त्याचा विजय होईल, असा उल्लेख करत त्यांनी भारतीय महिला संघालाही शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India W vs Australia W PM Modi Wishes Indian Women Cricket Team Ahead Of The ICC T20 World Cup 2020 Final says MCG will also be Blue tomorrow