पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताकडून चांद्रयान-३ची घोषणा, २०२० मध्येच पुन्हा मोहिम

चांद्रयान-३ ची घोषणा करण्यात आली.

भारताने २०२० मध्ये पुन्हा एकदा चांद्रयान मोहिम आखली असल्याचे केंद्रीय विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी मंगळवारी सांगितले. चांद्रयान-३ मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि रोव्हर यांचे सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्र्यांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; १०२ लाख कोटींच्या योजनांची घोषणा

जितेंद्र सिंग म्हणाले, चांद्रयान ३ मोहिम २०२० मध्येच आकाराला येते आहे. त्याचवेळी चांद्रयान २ मोहिम अपयशी ठरली, असे मुळीच म्हणता येणार नाही. या मोहिमेमुळे भारताला खूप काही शिकता आले. जगात कोणत्याही देशाने चंद्रावर पहिल्याच प्रयत्नात सॉफ्ट लँडिंग केलेले नाही. अमेरिकेला सुद्धा यासाठी खूप वेळा प्रयत्न करावे लागले. अर्थात भारताला खूप प्रयत्न निश्चितपणे करावे लागणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

चांद्रयान २ मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २ किलोमीटरवर असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला होता. त्यानंतर लँडरचे चंद्रावरील अपेक्षित पृष्ठभागापासून ५०० मीटर अंतरावर हार्ड लँडिंग झाल्याचे स्पष्ट झाले होते. खुद्द जितेंद्र सिंग यांनीच संसदेत दिलेल्या माहितीमध्ये हार्ड लँडिंग झाल्याचे सांगितले होते.

'मुंबई मेट्रो'च्या एमडी अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती

चांद्रयान २ मोहिम यशस्वी ठरली असती तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरविणारा भारत जगातील पहिला देश ठरला असता. या आधी अमेरिका, पूर्वीचा रशिया (युएसएसआर) आणि चीन यांनी चंद्रावर लँडर उतरविले आहेत.