पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WHO च्या कार्यकारिणीत भारताला मिळणार मानाचे स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाच्या दरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक सभेत भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत कार्यकारिणी अध्यक्षपदाचा मान भारताला मिळणार आहे. त्यामुळे २२ मे रोजी होणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत भारत नेतृत्वाच्या भूमिकेत दिसेल. जपानचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची जागा भारताला मिळणार आहे. दिल्ली आणि जिनेव्हाच्या राजदूतांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.  

लॉकडाऊनमध्येही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खेरेदीला 'अच्छे दिन'

जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भारताची नियुक्ती करण्याचा निर्णय मागील वर्षीच्या दक्षिण पूर्व आशिया समुहाच्या परिषदेमध्ये घेण्यात आला होता. यावेळी पुढील तीन वर्षांसाठी भारताला कार्यकारणी बोर्डात कायम ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. याशिवाय एका वर्षाने आलटून पालटून देण्यात येणाऱ्या अध्यक्षपदामध्ये भारताचे नाव सामील करण्यात आले होते.  

देशव्यापी लॉकडाउनदरम्यान हवेचा दर्जा सुधारला, नासाने शेअर केले फोटो

चीनच्या वुहानमधून जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अनेक राष्ट्रांवर लॉकडाउनचा कठोर निर्णय घेण्याची नामुष्की ओढावली आहे. कोरोनाच्या लढ्यात विकसनशील देश हतबल झाले असताना भारताने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या कौतुकामुळे भारत या लढ्यात सकारात्मक दृष्ट्या लढत असल्याची पुष्टी झाली होती. एवढेच नाही तर माणूसकीच्या नात्याने  कोरोनावरील उपचासाठी उपयुक्त ठरत असलेले हायड्रोक्लोरोक्विन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णयही भारताने घेतला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India to get lead role at World Health Organisation next month amid global Coronavirus crisis