पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारचा खास प्लॅन

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक राष्ट्रांनी लॉकडाऊनचे पाउल उचलले आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय विमान सेवाही ठप्प झाली आहे. या संकटामुळे परदेशात अडकून असलेल्या भारतीयांना पुन्हा मायेदेशी आणण्याची योजना आखण्यात येत आहे. परराष्ट्र आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या हजारो नागरिकांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी  एक खास नियमावली तयारी केली आहे.

प्लाझ्मा थेरपीवरुन केंद्राचा इशारा; अजून उपचाराला मंजुरी नाही

सर्वात प्रथम श्रमिक वर्गाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी आणि अन्य व्यक्तींना परत आणण्यात येईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी श्रमिक वर्गातील लोकांना आणण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या आणि परदेशी भ्रमंतीसाठी गेलेल्याना परत आणण्यात येईल. 

धार्मिक रंग न देता कारवाई करा, बुलंदशहरप्रकरणी CM ठाकरेंची प्रतिक्रिया

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पश्चिम आशियातील राष्ट्रांत मजूर वर्ग  मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. प्रकल्प बंद झाल्यामुळे अनेकांनी नोकरी गमावली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गल्फ राष्ट्रांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत भारतीयांकडे लक्ष देण्यासंदर्भात विनंती केली आहे.  परदेशात वास्तव्यास असलेल्या १.२६ कोटी भारतीयांपैकी ७० टक्के लोक ६ गल्फ राष्ट्रात वास्तव्यास आहेत. यात संयुक्त अरब अमिरातमध्ये ३४ लाख भारतीय असून २६ लाख सऊदी अरबियात तर कुवेत, ओमान, कतर आणि बहरीन याठिकाणी जवळपास २९ लाख भारतीय वास्तव्यास आहेत.  

बुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत

गल्फ राष्ट्रांशिवाय ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, रशिया, सिंगापूर, फिलिपाइन्स या ठिकाणीही अनेक भारतीय नागरिक अडकून आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एकट्या रशियात जवळपास 15 हजार विद्यार्थी अडकले आहेत. सध्याच्या परिस्थितीत परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशात परत आणण्याची मोहिम खूप कठिण आहे. भारतात आणण्यात येणाऱ्या सर्वांचि स्क्रिनिंग केली जाईल त्यानंतर त्यांना क्वारंटाइन केंद्रात पाठवायचे की रुग्णालयात दाखल करायचे यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली.