पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील १७० जिल्ह्यांवर हॉटस्पॉटचे संकट, आरोग्य मंत्रालयाची माहिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल

कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार संगनमताने योग्य ते निर्णय घेत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. सध्याच्या परिस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीवरुन जिल्हानिहाय तीन गटात वर्गवारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील १७० जिल्ह्यांचा हॉटस्पॉटमध्ये  तर जवळपास २७० जिल्हे हे नॉन हॉटस्पॉट ठिकाणे म्हणून घोषित करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,  अशी माहिती  लव अग्रवाल यांनी दिली.  

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर, ११७ रुग्णांमध्ये भर

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ११ हजारहून अधिक झाला आहे. सध्याची परिस्थिती ही सामूहिक संक्रमणाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे मानायचे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर सद्यपरिस्थितीत आपल्यावर (भारत देशावर) सामूहिक संक्रमणाची परिस्थिती ओढावलेली नाही, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात घ्यावयाच्या खबरदारी संदर्भात केंद्राने राज्य सरकारला काही विशेष सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात विविध राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, आरोग्य सचिव, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, पोलिस अधीक्षक, नगर आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

... म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी सेल्फ क्वारंटाईन

यावेळी हॉटस्पॉटसंदर्भात विशेष चर्चा करण्यात आली. कोविड रुग्णालय उभारण्याच्या सूचनाही राज्य सरकारला दिल्या असून ज्या जिल्ह्यांत कोरोना विषाणूने शिरकाव केलेला नाही ती परिस्थिती कायम राहिल यावर लक्षकेंद्रीत करण्याची गरज असून या ठिकाणीही क्लिनिकल व्यवस्थापनेची अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्यांना देण्यात आल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India tested more than 11 thousand COVID19 positive case Health ministry said no any community transmission