पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाककडून हवाई हद्द नाकारण्याचा विषय भारत आंतराष्ट्रीय पातळीवर नेणार

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानासाठी पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्यास परवानगी नाकारल्यानंतर भारताने हा विषय आता आंतरराष्ट्रीय लवादाकडे नेला आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेकडे हा विषय उपस्थित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितल्यानंतर ती उपलब्ध करून दिली जात असते.

जास्तीत जास्त अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप, शिवसेनेमध्ये टस्सल

नरेंद्र मोदी सोमवार, २८ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या सौदी अरबिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सौदीच्या अध्यक्षांची भेट घेणार असून, तेल, गॅस यासह काही महत्त्वपूर्ण प्रकल्पासंदर्भात दोन्ही देशाच्या प्रमुखांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटी दरम्यान दोन्ही नेते काही करारांवर देखील स्वाक्षऱ्या करणार आहेत. याच भेटीसाठी भारताने पाकिस्तानकडे हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली होती. पण पाकिस्तानने परवानगी देण्यास नकार दिला. 

मुंबईकर मराठी माणसाचा विश्वास शिवसेनेवर, निवडणुकीतून स्पष्ट

आंतरराष्ट्रीय पातळीवर जे संकेत आहेत. ते पाकिस्तानकडून पाळले जात नाहीत. चुकीच्या पद्धतीने चित्र रंगवून आणि खोटी कारणे पुढे करून पाकिस्तान सरसकट सर्वांना एकाच पद्धतीची वागणूक देतो आहे, असे या सूत्राने सांगितले. कोणत्याही देशाकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हवाई हद्द वापरण्याची परवानगी लगेचच दिली जाते. पण पाकिस्तानने ही परवानगी नाकारली.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India takes Pak to world body for denying permission to use airspace for PM Modis flight to Saudi Report