पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकमध्ये शीख युवकाची हत्या, भारताकडून संतप्त प्रतिक्रिया

पाकमध्ये अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये शीख समुदायातील युवकाच्या हत्येची घटना निंदणीय असल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानने खोटे बोलणे बंद करुन अशी कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. भारतीय पराष्ट्रमंत्रालयाने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. दुसऱ्याला उपदेश देण्याऐवजी अल्पसंख्यांकांना सुरक्षेची जबाबदारी घ्या, असा सल्ला भारताने पाकिस्तानला दिलाय. 

दंगेखोरांच्या हातात राज्य देणार का? अमित शहा

रविवारी पाकिस्तानमधील पेशावरमध्ये २५ वर्षीय शीख युवकाची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  युवकाचा मृतदेह चमकानी पोलिस स्थानकाच्या हद्दीत सापडले होते. पेशावरच्या पोलिस अधिकाऱ्याने या तरुणाचे नाव रिवंद्र सिंह असल्याची माहिती दिली होती. याप्रकरणात अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते.  शीख युवकाच्या हत्येच्या घटनेपूर्वी लाहोरमधील नानकाना साहिब गुरुद्वारामध्ये जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. या आंदोलनाचे नेतृत्व मोहम्मद हसन यांच्या कुटुंबियांनी केल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमातून झळकले होते.

मनसेच्या इंजिनची दिशा बदलली, आता झेंड्याचाही रंग बदलणार ?

या घटनेचे पडसाद भारतातही उमटले. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती आणि शिरोमणी अकाली दल यांच्या सदस्यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयानजीक निदर्शने केली. त्यांनी पाकिस्तान व इम्रान खान यांच्या विरोधात घोषणा दिल्या. नानकाना साहिब गुरुद्वारावर एका जमावाने हल्ला करून त्याची विटंबना केल्याचे प्रसारमाध्यमात झळकलेले वृत्त वृत्त पाकिस्तानने फेटाळले होते. या गुरुद्वाराचे काहीही नुकसान झालेले नसून, तो नष्ट झाल्याचा दावा खोटा असल्याचे त्या पाकने म्हटले होते.