पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चुकून सीमा ओलांडून गेलेल्या भारतीयांवरून पाकचे 'नापाक' राजकारण

प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्यावर्षी अनावधानानं सीमा पार करून पाकिस्तानात गेलेल्या दोन भारतीय तरुणांना अटक केल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमातून वारंवार प्रकाशित केल्या जात आहेत. यावर भारतानं आपत्ती दर्शवली आहे. भारतानं महिन्याभरापूर्वीच पाकिस्तानच्या सरकारकडे या तरुणांना दुतावासाची मदत (कॉन्स्युलर एक्सिस) मिळवून देण्याची मागणी केली होती मात्र भारताच्या मागणीला कोणताही प्रतिसाद पाकिस्ताननं दिलेला नाही. हे दोन्ही  तरुण भारताविरोधातील पाकच्या 'नापाक' राजकारणाला बळी पडू शकतात अशी भीती भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

दोन भारतीय तरुण सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानत पोहोचले, त्यांना  पाकिस्तानी रेंजर्सन अटक केली. या तरुणांना कॉन्स्युलर एक्सिस मिळवून देण्याबाबत भारतीय अधिकाऱ्यांनी  २३ मे रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्रखात्याला पत्र लिहिले होते. मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिला नाही, अशी माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी दिली.

त्यानंतर १३ नोव्हेंबरला पुन्हा एकदा भारतीय अधिकाऱ्यांनी चुकून  सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या  भारतीयांना कॉन्स्युलर एक्सिस देण्याची विनंती केली होती. यातील बारी लाल या भारतीयाला कॉन्स्युलर एक्सिस मिळवून देण्यासाठी डिसेंबर २०१८ पासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद पाकिस्तानातून मिळालेला नाही. 

कुणासोबत सरकार स्थापन करण्याबाबत काहीच ठरलेलं नाही : शरद पवार

'पाकिस्तानानं अटक केलेले भारतीय हे निर्दोष आहेत, त्यांना मदत मिळावू म्हणून भारताचे प्रयत्न सुरू आहेत मात्र पाकिस्तान भारताच्या विनंतीला कोणताही प्रतिसाद देत नाही. हे निर्दोष भारतीय पाकिस्तनच्या भारतविरोधी  अपप्रचारास कारणीभूत ठरू नये', अशी आशा भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

...म्हणून राऊतांनी घेतली पवारांची भेट

सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेल्या ५ भारतीय  आणि १०० मच्छिमारांच्या सुटकेसाठी भारत गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत, त्यांनी शिक्षाही भोगली आहे. आता पाकिस्तान मानवी हक्कांवरून राजकारण करणं थांबवेल अशी एकमेव इच्छा आमची असल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.