पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आणीबाणीत संघर्ष करणाऱ्यांना पंतप्रधानांचा सलाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीदरम्यान लोकशाही आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्यांचे स्मरण करत टि्वट केले आहे. २५ जून १९७५ मध्ये देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. पंतप्रधान मोदी यांनी आणीबाणी काळातील व्हिडिओ शेअर करत म्हटले की, हुकूमशाही मानसिकतेविरोधात आवाज उठवणाऱ्या सर्व नायकांचे भारत आजही स्मरण करतो. 

मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, भारत त्या सर्व महान लोकांना सलाम करतो, ज्यांनी आणीबाणीचा निडरतेने सामना केला. भारताच्या लोकशाही मूल्यांनी हुकूमशाही मानसिकतेचा यशस्वी सामना केला. दरम्यान, आणीबाणीच्या काळात अनेक दिग्गज नेते जसे जयप्रकाश नारायण, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना कारावास भोगावा लागला होता. 

'राहुल गांधींनी डाव्यांविरोधात निवडणूक लढवणे दुर्देवी'

भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही टि्वट करत आणीबाणीचा विरोध करणाऱ्यांचे स्मरण केले आहे. शहा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, १९७५ मध्ये आजच्याच दिवशी केवळ आपल्या राजकीय हितासाठी देशातील लोकशाहीची हत्या करण्यात आली. देशवासियांचे मुलभूत अधिकार काढण्यात आले. वृत्तपत्रांना टाळे लावण्यात आले. लाखो राष्ट्रभक्तांनी लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी अनेक यातना सहन केल्या. मी त्या सर्वांना नमन करतो.

ईव्हीएममध्ये घोळ आढळला नाही तर मिशी काढेनः उदयनराजे

१९७७ मध्ये आणीबाणी हटवल्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला होता. देशात पहिल्यांदा जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची सत्ता आली होती. आणीबाणी लागू केल्याने इंदिरा गांधी यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती.