पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

भारतातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळात आढळला होता.

कोरोना विषाणूने जगभरात कहर माजवला आहे. चीनमध्ये ९०० हून अधिक लोकांचा या रोगाने जीव घेतलाय. भारतातील केरळात या विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळल्याने देशातही खळबळ माजली होती. चीनमधील वुहान येथून त्रिशूरा येथे आलेल्या विद्यार्थीनी कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले होते. तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे. तिला लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.  

कोरोना: फिलीपाइन्सवरुन परतलेला पुण्यातील युवक रुग्णालयात

केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले तीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्णाण झाले होते. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत कोरोना विषाणू ही राज्याची आपत्ती असल्याचे जाहिर केले होते. ३० जानेवारी रोजी केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. 

कोरोनाच्या फैलावाने धोकादायक बनलेल्या देशांच्या यादीत भारत या स्थानी

या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या जाळ्यात सापडलेला पहिला रुग्ण या आजारातून सावरल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णाची नुकतीच झालेली चाचणी निगेटिव्ह असून आम्ही आणखी एका चाचणीची वाट पाहत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. या चाचणीच्या निदानानंतर रुग्णाला घरी सोडू असेही ते म्हणाले. एवढेच नाही तर इतर दोन रुग्णही सावरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.