पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केरळमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनामुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. भारतात कोरोना बाधित पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. आता राज्य सरकारनं दिलेल्या नव्या माहितीनुसार केरळमध्ये  कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. केरळमध्ये आठवड्याभरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. हा रुग्ण नुकताच वुहानमधून भारतात परतला होता. वुहान शहर हे कोरोनाचं केंद्रबिंदू आहे. सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्णांचे बळी हे वुहान शहरात गेले आहेत. 

चिनी महिलेचा भारतात विवाह, वधू पक्षाची डॉक्टरांकडून तपासणी

यापूर्वी केरळमध्ये आढळलेले कोरोनाचे दोन रुग्णदेखील वुहानमधूनच भारतात परतले होते. रविवारी केरळमध्ये दुसरा कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तो २२ वर्षी वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी  आहे.  कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये  ३६१ लोकांचा मृत्यू झाला आहे  तर १७, ००० लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य आणीबाणी जाहीर केली असून काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

पुण्यात कोरोनाचे तीन नवे संशयित रुग्ण, एकूण संशयितांची संख्या ८ वर

चीनमध्ये असलेल्या ६००हून भारतीयांना गेल्या आठवड्यात  भारतात परत आणण्यात आलं होतं. त्यांना दिल्लीत ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. पुण्यात कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या चार रुग्णांवर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांना रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. १८ जानेवारीपासून आतापर्यंत ८ जणांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.