देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात आज (शुक्रवारी) खूप मोठ्या संख्येने वाढ झाली. मागील २४ तासांत देशभरात ८९६ नवे रुग्ण आढळले असून कोरोना विषाणूने ३७ जणांचा बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत ६ हजार ७६१ लोकांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा हा दोनशेहून अधिक झाला आहे. मागील चोवीस तासातील ८९६ नवे रुग्ण आणि ३७ जणांचा मृत्यू ही देशातील आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे.
कोरोनामुळे १९३० नंतर प्रथमच जगात महामंदी येणारः आयएमएफ
देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता पंजाब राज्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे पंजाब हे देशातील दुसरे राज्य आहे. यापूर्वी ओडिसा सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला होता. कोरोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला होता. २४ ते १४ एप्रिलपर्यंत देशात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद आहेत. परिस्थिती जैसे थे असल्यामुळे ओडिसा आणि पंजाब या दोन राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय.