पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांचा दावा खोटा, मोदींनी मदतीची मागणी केलीच नाही

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव सोमवारी सादर केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी व्हाइट हाऊस येथे ट्रम्प यांची पहिल्यांदाच भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिल्याचा खळबळजनक दावा फेटाळला आहे.

'ICJ चा निकाल अंतिम, पाकला कुठेही दाद मागता येणार नाही'

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य फेटाळत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचे माध्यमांत आलेले वृत्त आम्ही ऐकले आहे. परंतु, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना अशा कोणत्याच प्रकारची विनंती केलेली नाही. 

दुसऱ्या एका टि्वटमध्ये त्यांनी म्हटले की, सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा करण्यावर भारत ठाम आहे. पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा होण्यापूर्वी त्यांनी सीमारेषेवरील दहशतवाद संपुष्टात आणावा, ही आमची अट कायम आहे. सिमला समजोता आणि लाहोर घोषणेच्या आधारे भारत आणि पाकिस्तानमध्ये सर्व मुद्द्यांवर दि्वपक्षीय स्तरावर समस्येचे निराकरण व्हावे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मोदी आणि मी मागील महिन्यात जपानमधील ओसाका येथील जी-२० शिखर संमेलनात काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली होती. त्यावेळी मोदी यांनी आपल्याला काश्मीर मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव सादर केला होता, असा ट्रम्प यांनी दावा केला होता.

तोंडघशी पडूनही पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात विजय आमचाच

मी २ आठवड्यांपूर्वी पंतप्रधान मोदींबरोबर या विषयावर (काश्मीर) चर्चा केली होती. यावेळी मोदींनी मला मध्यस्थी कराल का?, असा सवाल केला. मी त्यांना कुठं? असा प्रतिप्रश्नही केला. त्यावर मोदींनी काश्मीर, असे म्हटले.