पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात २४ तासांत कोरोनाचे ६२० नवे रुग्ण

कोविड १९

भारतात सोमवारपर्यंत कोरोना विषाणूची बाधा होऊन ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत भारतात ३५ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. तर ६२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात रुग्णांची संख्या ही ९ हजार १५२ वर पोहोचली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजेपर्यंत कोरोना विषाणूच्या  एकूण ७ हजार ९८७  अॅक्टीव्ह केसेस भारतात आहेत. तर आतापर्यंत ८५७ लोकांनी यावर मात केली आहे किंवा त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे. 

दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा होणार नाही

भारतात सर्वाधिक कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रविवारी राज्यात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १६, पुण्यातील ३, नवी मुंबईतील २  आणि सोलापूरच्या १ रुग्णाचा समावेश आहे.

राजधानी दिल्लीतही कोरोना बाधितांचा आकडा हा १ हजार २०५ वर पोहोचला आहे. यापैकी २४ जणांचा मुत्यू झाला आहे तर २७ जण मृत्युमुखी पडले आहेत.

भारताच्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक आणि ८ दहशतवादी ठार