पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या फैलावामुळे धोकादायक बनलेल्या देशांच्या यादीत भारत या स्थानी...

कोरोना विषाणू

चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा जगातील इतर देशांमध्ये फैलाव होण्याची शक्यता असलेल्या यादीमध्ये भारताचा क्रमांक १७ वा आहे. गणितीय पद्धतीने केलेल्या संशोधनावरून संशोधकांनी विविध देशांची एक यादी तयार केली आहे. याच यादीमध्ये भारत सतराव्या स्थानी आहे. चीनमधील वुहानमध्ये कोरोना विषाणूचा सर्वात आधी फैलाव झाला.

हिंगणघाट प्रकरणी ग्रामस्थ संतप्त; पोलिस आणि रुग्णवाहिकेवर दगडफेक

भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले तीन रुग्ण आढळले आहेत. हे तिन्ही रूग्ण केरळमध्ये आहेत. केरळ राज्यात आरोग्य पातळीवर खबरदारीच्या अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. 

भारतातील विमानतळांचा विचार केल्यास दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्थिती सर्वात जास्त धोकादायक आहे. त्यानंतर मुंबई, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोची येथील विमानतळांचा क्रमांक आहे. जर्मनीतील रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूट आणि हमबोल्ट विद्यापीठ येथील संशोधकांनी गणितीय पद्धतीने हे मॉडेल विकसित केले आहे.

सार्वजनिक रस्ता बेमुदत काळासाठी अडवू शकत नाही - सुप्रीम कोर्ट

हवाई मार्गानेच या विषाणूचा जगातील इतर देशांमध्ये फैलाव होतो आहे, याकडेही सशोधनात लक्ष वेधण्यात आले आहे. वुहान हे चीनमधील सातव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. वुहानमधील एक कोटी १० लाख लोक राहतात. या आजाराच्या उद्रेकानंतर वुहानमधील आंतरराष्ट्रीय उड्डाणे २३ जानेवारीपासून बंद करण्यात आली आहेत.