पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारणारः इस्रो प्रमुख

प्रतिकात्मक छायाचित्र (PTI)

भारत आपले स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याच्या तयारीत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के सिवन यांनी ही माहिती दिली. अंतराळ स्थानक उभारणे हे गगनयान मोहिमेचे विस्तारीकरण असल्याचे त्यांनी सांगितले. मानवी अंतराळ मोहिमेनंतर आम्ही गगनयानचा कार्यक्रम सुरु ठेवला. आता भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची तयारी करत आहे, असे सिवन म्हणाले.

तत्पूर्वी सरकार आणि इस्रोने संयुक्त पत्रकार परिषदेत १५ जुलै रोजी लाँच होणाऱ्या मिशन चांद्रयान-२ ची माहिती दिली. तसेच भारताची नजर आता शुक्र आणि सूर्याकडे असल्याचे सांगितले. मिशन चांद्रयानसाठी एकून १० हजार कोटींचा खर्च झाला. भारताच्या महत्वकांक्षी अंतराळ प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली. मागील काही काळात भारताने अंतराळात अनेक मोठे यश मिळवल्याचे ते म्हणाले.

'रिसॅट २बी' उपग्रहाचे प्रक्षेपण, इस्रोचे आणखी एक यशस्वी पाऊल!

यावेळी के सिवन यांनी भविष्यातील योजनांबाबत सांगितले. भारतीय अंतराळ विज्ञानाने सूर्य, शुक्र सारख्या ग्रहांपर्यंत जाण्याचे लक्ष्य निर्धारित केले असल्याचे त्यांनी सांगितले.