पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत-पाकदरम्यान तणाव घटला, मदतीसाठी मी तयारः डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

भारत आणि पाकिस्तान दरम्यान मागील दोन आठवड्यापूर्वीच्या तुलनेत आता तणाव कमी झाल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. जर या दोन्ही देशांची इच्छा असेल तर मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. ट्रम्प यांनी हे वक्तव्य २६ ऑगस्ट रोजी फ्रान्समध्ये जी ७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर केले आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पाक दरम्यान कोणत्याही मुद्द्यावर तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते.

सोमवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांना म्हटले की, तुम्हाला माहीत आहे की, काश्मीरवरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद आहे. माझ्या मते २ आठवड्यांपूर्वी जितका तणाव होता, तो आता कमी झाला आहे.

वायुदलाच्या माजी कर्मचाऱ्याने मोदींना ५ पानी पत्र लिहून केली आत्महत्या

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून भारत आणि पाकमध्ये तणाव वाढला आहे.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थीसाठी अनेक वेळा आपली इच्छा जाहीर केलेल्या ट्रम्प यांनी याचा पुनरुच्चार केला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या स्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, मला दोन्ही देशांची साथ चांगली वाटते. जर त्यांना आवडलं तर, मी त्यांची मदत करु इच्छितो. त्यांना माहीत आहे की, त्यांच्यासमोर हा प्रस्ताव आहे. 

जुलैमध्ये पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, भारताने हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगत प्रस्ताव फेटाळला होता. मोदींनी मध्यस्थी करण्यास सांगितल्याचा ट्रम्प यांचा दावा ही भारताने फेटाळला होता.

प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याची वेळ आली: नरेंद्र मोदी