पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर पाच कोटी लोक नाहक मारले जातील

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे.

काश्मिरच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्द केल्यानंतर तर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानकडून अणुयुद्धाचा इशारा दिला जातो. अर्थात अणुयुद्धाचा वापर केल्यास त्याचे परिणाम किती गंभीर होतील, हे पाकिस्तानला माहिती आहे. त्यामुळे तो देश सध्यातरी युद्धाच्या दिशेने जाणार नाही. तरीही एका अहवालानुसार जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत अणुयुद्ध झाल्यास कमीत कमी पाच कोटी लोक मारले जातील. 

वरळीत शिवसेनेकडून मोठे शक्तिप्रदर्शन, आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार

जर्नल सायन्स ऍडव्हान्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये या दोन्ही देशांत २०२५ मध्ये युद्ध भडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर खरोखरच दोन्ही देशात असे युद्ध भडकले तर किमान पाच कोटी लोक नाहक मारले जातील, असेही या लेखात म्हटले आहे. दरम्यान, भारतातील अभ्यासकांच्या मतांनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अशा पद्धतीने युद्ध होण्याची शक्यता खूप कमी आहे. 

मनसेला धक्का, नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश

अणुयुद्धामुळे दोन्ही देशातील पर्यावरणावरही दूरगामी परिणाम होतील, याकडेही लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. या स्वरुपाच्या युद्धामुळे हवेतील कार्बनचे प्रमाण खूप वाढेल. यामुळे वातावरणावर परिणाम होईल. हवेतील उष्णतेचे प्रमाण वाढू शकेल, असेही त्यामध्ये लिहिण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india pak nuke war could trigger another ice age and 50 million people could die says study