पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मजकूर हटवण्यासाठी TikTokकडे भारताची सर्वाधिकवेळा विनंती अहवालातून समोर

टिकटॉक

TikTokनं पहिल्यांदाच पारदर्शक अहवाल जाहीर केला आहे. TikTok युजर्सची माहिती हाताळण्यास मिळावी किंवा त्यावरील मजकूर काढण्यासाठी कोणत्या देशानं सर्वाधिक विनंती केल्या आहेत याची यादी टिकटॉकनं समोर आणली आहे. या यादीनुसार भारताकडून  मजकूर काढून टाकण्यासाठी किंवा युजर्सची माहिती हाताळण्यासाठी २०१९ या वर्षांत सर्वाधिकवेळा विनंती पाठवण्यात आल्याचं समोर आलं आहे.

 भारतानं या दोन्ही गोष्टींकरता टिकटॉककडे तब्बल ११० वेळा विनंती केली आहे. यातल्या ९९ विनंती या भारतानं युजर्सची माहिती हाताळण्यास मिळावी यासाठी केल्या होत्या. तर विशिष्ट मजकूर टिकटॉकनं काढून टाकावा अशी विनंती भारतानं ११ वेळा केली असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. २०१९ या वर्षांतील पहिल्या सहा महिन्यातील भारताकडून करण्यात आलेल्या विनंतीची ही आकडेवारी आहे. 

2020: वर्षभरात विवाह मुहूर्ताचा धडाका; पहा संपूर्ण यादी

यात दुसऱ्या क्रमांकावर  अमेरिकेचा समावेश आहे. अमेरिकेकडून पहिल्या सहा महिन्यात एकूण ७४ विनंती करण्यात आल्या होत्या. त्यातल्या ६८ विनंत्या हा  युजर्सची माहिती हाताळण्यास मिळावी यासंदर्भातील होत्या. तर ६ विनंत्या या मजकूर हटवण्यासाठी होत्या. 

 आश्चर्य म्हणजे या यादीत चीनचं नाव नाही. चीनकडून कोणतीही विनंती करण्यात आली नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. अनेक देशात TikTokहे अ‍ॅप वादात सापडलं आहे. भारतातही काही महिन्यांपूर्वी या अ‍ॅपवर  बंदी घालण्याची  मागणी जोर धरत होती. 

मारुती सुझुकी आणि महिंद्रा एँड महिंद्रासाठी वर्षाचा शेवट गोड!