पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गूड न्यूज : देशात यंदा सरासरी इतका पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ

एकीकडे कोरोना विषाणू संक्रमणामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि दुसरीकडे वाढत्या पाऱ्यामुळे घरात असलो तरी उकाड्याने जिवाची घालमेल होत असताना एक सुखावणारी बातमी आली आहे. देशात यंदाही सरासरी इतकाच पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने नोंदविला आहे. जूनपासून देशात पावसाळ्याला सुरुवात होते. त्याआधी दोन ते तीन वेळा हवमानशास्त्र विभागाकडून मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येतो. बुधवारी पहिला अंदाज वर्तविण्यात आला आहे.

'कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट, बेरोजगारीचं प्रमाण वाढणार'

देशात गेल्यावर्षी अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. महाराष्ट्राच्या अनेक भागांत गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सध्याही अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. देशातील एकूण पावसापैकी ७० टक्के पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये पडतो. जून ते सप्टेंबर हा काळ देशात मान्सूनचा असतो.

अफवांवर विश्वास ठेवू नका, विशेष रेल्वे सोडणार नाही: रेल्वे मंत्रालय

देशातील खरीपाच्या पिकांसाठी मान्सूनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. तांदूळ, ऊस, गहू, डाळी या स्वरुपाच्या पिकांसाठी मान्सून पुरेशा प्रमाणात पडणे महत्त्वाचे असते. असे असताना हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे.