पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...

अभिजित बॅनर्जी यांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेट

यंदाचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या आठवड्यातच अभिजित बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले आहेत. यामुळे या भेटीला महत्त्व आहे.

... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही

अभिजित बॅनर्जी यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. लोकांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची त्यांची तळमळ स्पष्टपणे दिसते. त्यांना मिळालेल्या यशाचा भारताला निश्चितच अभिमान आहे. भविष्यातही त्यांना यश मिळो, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीनंतर केले आहे. 

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन, पण तूर्त सुटका नाही

गेल्या आठवड्यात अभिजित बॅनर्जी, त्यांची पत्नी इस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर यांना यंदाचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. जागतिक गरिबी निर्मुलनासाठी त्यांनी केलेल्या संशोधनाचा विचार करून या तिघांना नोबेल जाहीर करण्यात आला आहे. अभिजित बॅनर्जी हे सध्या मॅसॅच्युसेट इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.