पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानाच्या 'गझनवी'ची भारताला चिंता नाही

पाकिस्तानाच्या 'गझनवी'ची भारताला चिंता नाही

काश्मीरवरुन सुरु असलेल्या तणावादरम्यान गुरुवारी पाकिस्तानने कमी अंतराच्या गझनवी या बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. पण यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थांना कोणतीच चिंता नाही. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे आपल्याला चिंताग्रस्त होण्याची गरज नसल्याचे भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते ही क्षेपणास्त्र चाचणी काश्मीर मुद्यावरुन इस्लामाबादकडून चिथावणी देण्याचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी 'जशास तसे' करण्याच्या नीतीत सहभागी होणार नाही. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एका राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याने हे सांगितले. 

आसाम NRC: अंतर्गत मुद्यावरुन इम्रान खान यांची पुन्हा घुसखोरी!

दरम्यान, परराष्ट्र विभागातील अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी 'हिंदुस्थान टाइम्स'ला सांगितले की, या क्षेपणास्त्राची चाचणी म्हणजे पाकिस्तानला चीनवर किती अवलंबून राहावे लागते हे दर्शवते (गझनवीची डिलिव्हरी प्रणाली चिनी एम-११ क्षेपणास्त्राची आहे) त्याचबरोबर भारताची स्वतःची क्षेपणास्त्र क्षमता पाकिस्तानच्या तुलनेत अधिक प्रगत आहे.

एम ११ क्षेपणास्त्र १९८७ मध्ये यू-२३५ अणवस्त्र उपकरणाच्या ब्ल्यू प्रिंटसह पाकिस्तानने चीनकडून घेतले होते. इतकेच नव्हे तर उत्तर कोरियानेही पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र विकासात महत्वाची भूमिका निभावली होती. जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करणे आणि कलम ३७० मधील बहुतांश तरतुदी हटवण्याच्या भारताच्या या निर्णयास पाकने आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करणे सुरुच ठेवले आहे. 

पाकिस्तानचा काश्मीर राग कुचकामी ठरवण्यासाठी भारत सज्ज

भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले की, स्थानिक क्षेपणास्त्र विकासक आणि सामरिक दल भारताच्या क्षमतांप्रती आश्वस्त आहेत. रावळपिंडीबरोबर कुस्तीचा सामना करण्याचा आमचा कोणताच हेतू नाही. 

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानकडून होणाऱ्या युद्धासारख्या प्रतिक्रिया येणे हे भारताला उकसवण्याचा प्रयत्न आणि पी-५ राष्ट्रांचे (संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य) लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. पी-५ राष्ट्रांनी मोदी सरकारला काही निर्देश द्यावेत अशी पाकला आशा आहे.

२२ दिवस झाले सासू सासऱ्यांशी संपर्क नाही, कलम ३७० वरून उर्मिला मातोंडकर यांची सरकारवर टीका

गझनवीची ताकद किती
पाकिस्तानने ज्या बलिस्टिक क्षेपणास्त्र गझनवीची चाचणी केली. ते जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची क्षमता २९० किमी दूरवरील लक्ष्य भेदण्यास ते सक्षम आहेत. पाकिस्तान मध्यम अंतरावरचे बलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याला गझनवी किंवा हत्फ-३ या नावाने ओळखले जाते.