पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत म्हणजे फक्त हिंदी बोलणारे राज्य नाहीः स्टॅलिन

एम के स्टॅलिन  (ANI/ File photo)

केंद्र सरकारला एकाही राज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसेच केवळ हिंदी भाषिक राज्य म्हणजे भारत नाही, अशा शब्दांत द्रमुक अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी ठणकावले आहे.

लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत आपल्या पक्षाच्या कामगिरीमुळे उत्साहित स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच त्यांचा पक्ष इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या सहाय्याने भाजपचा सामना करण्याविषयी भाष्य केले. पक्ष कार्यकर्त्यांना त्यांनी खुले पत्र लिहिले असून, त्यांनी त्यात म्हटले आहे की, द्रमुक इतर राज्यांमध्ये तामिळनाडूचे मॉडेल लागू करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणार आहे. त्याचबरोबर सांप्रदायिक सौहार्दासाठी इतरांशी समन्वय साधला जाणार आहे. 

राहुल गांधींनी पद सोडू नये, कार्यकर्ते आत्महत्या करतील; चिदंबरम यांचे भावनिक आवाहन

ते म्हणाले, पूर्वी भारताचा अर्थ केवळ हिंदी भाषिक राज्य असा होता. ते दिवस निघून गेले आहेत. येणारा काळ हा राज्यांभोवती फिरणाऱ्या सकारात्मक राजकारणाचे आहे. केंद्रात कोणतेही सरकार येवो. पण ते एकाही राज्याकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत. जनतेच्या हितांच्या रक्षणासाठी संसद आणि राज्यातील विधानसभेत द्रमुकाच आवाज घुमतच राहिल. 

दरम्यान, तामिळनाडूत द्रमुकने २३ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्या आघाडीला ३८ पैकी ३७ मिळाल्या आहेत.

काँग्रेसला आणखी धक्का, पुढच्या वर्षी राज्यसभेतही NDA ला बहुमत!