पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेने कासीम सुलेमानीला ज्या ड्रोन तंत्रज्ञानाने मारले तेच भारताला हवंय

ड्रोन तंत्रज्ञान

इराणी सैन्याचा कमांडर कासीम सुलेमानी याला अमेरिकेच्या ज्या ड्रोन तंत्रज्ञानाच्या साह्याने मारण्यात आले. तेच तंत्रज्ञान अमेरिकेकडून घेण्यात भारत उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती सूत्रांनी दिली.

बगदादस्थित अमेरिकी सैन्याकडून ड्रोनच्या साह्याने हवाई हल्ला घडवून ३ जानेवारीला इराणमधील सैन्यदलाचा कमांडर मेजर जनरल कासीम सुलेमानी मारला गेला होता. या घटनेनंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत हे तंत्रज्ञान अमेरिकेकडून घेण्यासाठी उत्सुक आहे. ड्रोनच्या साह्याने वेध घेऊन त्याच आधारावर कासीम सुलेमानी जिथे आहे तिथे क्षेपणास्त्र डागण्यात आले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी दोन नव्या इमारती

ड्रोनच्या साह्याने एखाद्या व्यक्तीला हेरून त्याला मारण्याचे तंत्रज्ञान भारताकडे उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. विशेषतः भारतात बेकायदा किंवा दहशतवादी कृत्ये करून पळून गेलेल्या आणि पाकिस्तानसह इतर देशात वास्तव्यास असलेल्या आरोपींना हेरणे यामुळे शक्य होईल, असे भारतीय सुरक्षा संस्थांना वाटते, असे सूत्रांनी सांगितले. 

भारतात मुंबई २६/११ चा दहशतवादी हल्ला करणारे, त्याचबरोबर गेल्या वर्षी पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हल्ला करणारे दहशतवादी त्यांचे सूत्रधार पाकिस्तानात लपून बसले आहे. त्यांना तिथे शिक्षा होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर या तंत्रज्ञानाचा भारताला उपयोग होऊ शकतो, असे सूत्रांना वाटते.

... तर तुमचे पॅनकार्ड बाद ठरणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावेळी या विषयावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताने हे तंत्रज्ञान घेण्यात आधीच रुची दाखविली आहे, असेही सांगण्यात आले आहे.