पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बालाकोटसाठी वापरलेले आणखी बॉम्ब विकत घेण्यासाठी भारतीय हवाई दलाचा करार

भारतीय हवाई दलाचे अधिकारी

पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करताना भारतीय हवाई दलाने जे बॉम्ब वापरले होते. ते आणखी खरेदी करण्यासाठी नुकताच इस्राईलमधील कंपनीशी करार करण्यात आला. हा करार ३०० कोटी रुपयांचा असून, या बॉम्बची निर्मिती करणारी कंपनी भारतीय हवाई दलाला १०० बॉम्ब देणार आहे. स्पाईस २००० असे या बॉम्बचे नाव आहे. इस्राईलमधील सरंक्षणविषयक दारूगोळा निर्मितीतील कंपनी राफाएलसोबत हा करार करण्यात आला आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच संरक्षणविषयक करार करण्यात आला आहे. तातडीची गरज म्हणून हे बॉम्ब विकत घेण्यात आले असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत ते भारतीय हवाई दलाच्या ताब्यात येतील, असे या कराराची माहिती देणाऱ्या सूत्रांनी सांगितले. 

'नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या कोणतीही बैठक नियोजित नाही'

१४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांने आत्मघाती हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले घडवून आणले. हवाई दलाच्या ताफ्यातील मिराज २००० लढाऊ विमानांच्या साह्याने हे हल्ले घडवून आणण्यात आले. दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त करण्यासाठी स्पाईस २००० हे बॉम्ब वापरण्यात आले होते. एकूण पाच बॉम्ब यावेळी तळांवर डागण्यात आले. प्रत्येक बॉम्बमध्ये ८० किलो इतक्या वजनाची स्फोटके होती. 

भाजपला टक्कर देण्यासाठी बंगालमध्ये ममतांच्या मदतीला प्रशांत किशोर

भारताने केलेल्या या कारवाईमुळे दहशतवादी तळांचे मोठे नुकसान झाले. पण पाकिस्तानने या कारवाईमुळे तेथील दहशतवादी तळांचे नुकसान झाल्याचे मान्य करण्यास नकार दिला. यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने आपली एफ १७ जातीची लढाऊ विमाने भारताच्या बाजून धाडली होती. पण भारतीय हवाई दलाच्या विमानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि भारतीय हवाई हद्दीत घुसू दिले नाही.