पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा

जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करत तिरंगा फडकावण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडिअमवर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अर्धसैन्य दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या परेडचे निरीक्षण केले. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, 'सुरक्षा दलांनी केलेल्या सततच्या कारवायांमुळे दहशतवाद्यांनी पराभव स्वीकारला आहे. तसंच केंद्र सरकारच्या निर्णयानंतर येथील लोकांना त्यांच्या ओळखीची चिंता करण्याची गरज नाही.

भारताकडे लकवरच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' असणार - मोदी

सत्यपाल मलिक यांनी पुढे असे सांगितले की, सरकारचे धोरण दहशतवाद मुळीच खपवून घेणारे नाही आणि सशस्त्र दलाच्या सततच्या कारवायांने दहशतवाद्यांनी हार मानली आहे. दहशतवादी संघटनांमध्ये काश्मीरी तरुणांचे सहभागी होण्याचे प्रमाण कमी झाले आहेत. तसंच नमाज अदा केल्यानंतर दगड फेकीच्या घटना देखील कमी झाल्या आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यामुळे तिथे सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जे ७० वर्षात झाले नाही ते ७० दिवसात केले - मोदी

दरम्यान, श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडिअमवर ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील सहभागी झाले होते. तसंच, जम्मू-काश्मीरच्या विविध भागामध्ये देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पहायला मिळाला. जम्मू-काश्मीरचे भाजप अध्यक्ष रविंद्र रैना यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त नृत्य केले.

लालकिल्ल्यावरील मोदींच्या भाषणातील १५ महत्त्वाचे मुद्दे