पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने पाकचे सर्व आरोप फेटाळले

विजय ठाकूर सिंह

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन भारतावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाचे उल्लंघन करण्यात येत आहे, असा आरोप पाकिस्तानने भारतावर केला होता.  जिनेव्हातील परिषदेत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव (ईस्ट)विजय ठाकूर सिंह यांनी भारताची बाजू मांडताना नाव न घेता पाकिस्तानवर शाब्दिक तोफ डागली.   

विजय ठाकूर सिंह म्हणाल्या की, काश्मीरसंदर्भात भारताने राज्यघटनेच्या चौकटीत राहून कायदेशीर पाऊल उचलले आहे.  एका प्रतिनिधीमंडळाने आमच्या देशासंदर्भात खोटे आरोप केले. सर्व जगाला माहित आहे की, ज्या देशात दहशतवाद्यांना खतपाणी मिळते, अशा देशाने आमच्यावर केलेल्या आरोपात काही तथ्य नाही.  

काश्मीर भारताचेच! जिनेव्हात पाक परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य

त्या पुढे म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काश्मीर खोऱ्यातील जनतेला आर्थिक, सामाजिक स्तरावर न्याय देण्यासाठी ठोस पावले उचलत आहे. जम्मू काश्मीर संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना थेट फायदा होणार आहे. लैंगिक विषमता पूर्णपणे नष्ट केली जाईल. न्यायिक अधिकार अधिक मजबूत होतील. तसेच शिक्षण क्षेत्रात विकास केला जाईल. काश्मीर खोऱ्यातील निर्बंध असताना प्रशासनाने जनतेपर्यंत जीवनावश्यक सेवा सुविधा पुरवल्या असून निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India hammers Pak at UN body meet over Kashmir says Fabricated narrative from epicentre of terror