पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू : चीनमध्ये अडकलेल्या ३०० भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलविणार

कोरोना विषाणू

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. सध्याच्या घडीला कोरोना विषाणूमुळे १७० लोकांचे बळी गेले आहेत. वुहान हे शहर या आजाराचा केंद्रबिंदू आहे. या शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या ३०० भारतीयांची सुटका करण्याचा प्रयत्न भारताचा सुरु आहे. या लोकांना चीनमधून बाहेर काढून एका सुरक्षित कक्षेत ठेवण्यात येणार आहे. यासाठी सुरक्षा कक्षही तयार करण्यात आले आहेत. 
३०० पैकी २०० भारतीय हे वैद्यकिय विद्यार्थी आहेत. ज्या भारतीयांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली नाहीत अशाच भारतीयांना चीन सोडून जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.  मात्र चीनमध्ये असलेल्या भारतीयांना या विषाणूची लागण झाल्याचं अद्यापतरी समोर आलेलं नाही. 

अन्न-पाण्याचा तुटवडा, चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं मदतीसाठी साकडं

''वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणं ही आमची प्राथमिकता असणार आहे. या भारतीयांच्या आरोग्याची चाचणी केली जाईल. सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना काही काळ सुरक्षा कक्षात रहावं लागेल. दिल्लीत त्यांना काही काळापुरता हलविण्याचा आमचा विचार आहे'', अशी माहिती  आरोग्य विभागानं दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून वुहानमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी त्यांना चीनमधून  सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना बाधीत ६ हजार नवीन प्रकरणं समोर आली आहे. जगभरातील जवळपास १४ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले  आहे. भारतातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनमधून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ४ हजारांहून अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूः एअर इंडिया, इंडिगोच्या चीनला जाणाऱ्या विमानसेवा स्थगित

 एअर इंडिया, इंडिगोसारख्या देशातल्या प्रमुख विमानसेवांनी भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या विमान सेवा स्थगित केल्या आहेत. एअर इंडियाची विमानसेवा ३१ जानेवारी ते  १४ फेब्रुवारीदरम्यान  स्थगित करण्यात आली आहे. तर इंडिगोची भारत- चीन विमानसेवा १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीदरम्यान स्थगित करण्यात आली आहे.