पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजार पार

कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २३ हजार पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार शुक्रवार सकाळपर्यंत देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही २३ हजार ७७ वर पोहोचली. यापैकी १७ हजार ६१० रुग्ण हे कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. तर ४ हजार ७४९ रुग्ण हे बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत ७१८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

७७८ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६,४२७ वर

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २४  तासांत देशात १६८४ नवे रुग्ण समोर आले आहेत तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातल्या आकडेवारीचा विचार करायचा झालाच तर गेल्या २४ तासांत जगभरात कोरोनामुळे ४ हजार  ५०० लोकांनी आपला प्राण गमावला आहे, त्यामुळे शुक्रवार सकाळपर्यंत संपूर्ण जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही १ लाख ८६ हजार ४६२ वर पोहोचली आहे. तर एफपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जगात २४ तासांत ६८ हजार १७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मेट्रो, मान्सूनपूर्व कामे, पिठांच्या गिरण्यांना लॉकडाऊनमधून सूट

जगाचा विचार करता अमेरिकेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही देखील अधिक आहे. इथे कोरोनामुळे आतापर्यंत ५० हजारांहून अधिक जाणांनी आपला प्राण गमावला आहे. 

'मोठ्याप्रमाणात टेस्ट होत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे'