पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पृथ्वी २ क्षेपणास्त्राची पुन्हा एकदा रात्रीच्यावेळी यशस्वी चाचणी

पृथ्वी २ क्षेपणास्त्र

भारताने अण्वस्त्रवाहू भारतीय बनावटीच्या पृथ्वी २ क्षेपणास्त्राची पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी यशस्वी चाचणी केली आहे. ३५० किलोमीटरच्या टप्प्यातील लक्ष्याचा वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची २० नोव्हेंबर रोजी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मंगळवारी रात्री याची चाचणी घेण्यात आली. 

नासाच्या दाव्यानंतर इस्रो प्रमुखांनी विक्रम लँडरबद्दल दिली ही माहिती

पृथ्वी २ क्षेपणास्त्राची घेण्यात आलेली चाचणी सर्व निकषांवर यशस्वी ठरली. हे एक नियमित परीक्षण होते. ओडिशातील चांदीपूर येथील एकीकृत परीक्षण स्थळावरून ७.५० वाजता हे क्षेपणास्त्र अवकाशात झेपावले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली हे परीक्षण करण्यात आले.