भारतात कोरोनानं आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. भारतात आढळलेल्या ४५ कोरोनाबाधितांपैकी ३५ जण हे इटलीतून परतले आहेत. त्यामुळे भारत सरकारानं इटली, कोरिया आणि त्याचबरोबर इतर देशांतून भारतात परतणाऱ्यांसाठी नवे नियम लागू केले आहेत. त्यांना सदर देशांतून भारतात येताना कोरोना विषाणूसंदर्भांत चाचणी केल्याचं आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे.
पुणे : कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचा शोध सुरु
कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत असे लिहिलेले आरोग्य प्रमाणपत्र त्यांना त्या देशातील स्थानिक अधिकृत आरोग्य केंद्रातून घेणं गरजेचं असणार आहे, असं भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे. हा नियम आजपासून भारतात येणाऱ्यांसाठी अनिवार्य असणार आहे.
Govt of India: Passengers travelling from/having visited Italy or Republic of Korea&desirous of entering India will need certificate of having tested negative for COVID-19 from designated laboratories authorised by health authorities of these countries from today.
— ANI (@ANI) March 10, 2020
तर फ्रान्स, जर्मनी, स्पेनमधील नागरिकांसाठी भारतात परतण्याचे दार तूर्त बंद करण्यात आले आहेत. आजपासून त्यांना देखील भारतात परतता येणार नाही. या देशांतील ज्या नागरिकांना ११ मार्च पूर्वी व्हिसा देण्यात आला आहे मात्र ते भारतात परतले नाहीत अशांना तूर्त देशात परतण्यापासून बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना : CM उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, IPL वरही चर्चा होणार
त्याचप्रमाणे १ फेब्रुवारीनंतर या देशांत प्रवास केलेल्या परदेशी नागरिकांचा देण्यात आलेला व्हिसादेखील भारतानं रद्द केला आहे. भारतात परतत असलेल्या प्रत्येक नागरिकांची आरोग्य चाचणी केली जात आहे.