पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WTO कडून भारत-चीन या राष्ट्रांना मिळणारा 'लाभ' अमेरिकेसाठी 'तोट्या'चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला जागतिक व्यापारी संघटनेकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भात आक्षेप घेतला आहे. भारत-आणि चीन हे विकसनशील राष्ट्रांच्या गटात मोडत नाहीत, त्यामुळे त्यांना जागतिक व्यापारी संघटनेकडून (WTO) लाभ मिळू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

अमेरिकेतील एका सभेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि चीन आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे देश आहेत. मात्र तरी देखील हे दोन्ही देश जागतिक व्यापार संघटनेकडून विकसनशील देशाचा दर्जा मिळवून लाभ घेत आहेत. या राष्ट्रांना मिळणाऱ्या लाभामुळे अमेरिकेला नुकसान सहन करावे लागत आहे. हे देश आता विकसनशील नसून त्यांना हा लाभ मिळू देणार नाही, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले. जागतिक व्यापरी संघटना या मुद्द्याकडे निपक्षपातीपणे निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 'वीरचक्र' पुरस्कार

यापूर्वी अमेरिकेच्या उत्पादनावर अधिक कर लागू करण्यात येण्याच्या भारताच्या भूमिकेवर अमेरिकेने आक्षेप घेतला होता. दक्षिण आशियाई राष्ट्रांतील भारताकडून अधिक प्रमाणा कर लादले जातात, अशी टीका देखील अमेरिकेकडून करण्यात आली होती. अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या व्यापार युद्ध सुरु आहे. ट्रम्प यांनी चीनी वस्तूंवर दंडात्मक स्वरुपात शुल्क आकारणी केल्यानंतर चीनने अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले आहे.  

कलम ३७०: पाकिस्तानने युएनएससीकडे बैठकीची केली मागणी