पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात २४ तासांत कोरोनाचे १४२९ रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या २४,५०६ वर

संग्रहित छायाचित्र

देशात गेल्या २४ तासांत १ हजार ४२९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे तर ५७ जण मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता देशांत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा २४ हजार ५०६ वर पोहोचला आहे. या आकडेवारीपैकी भारतात सध्या १८ हजार ६६८ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत तर ५ हजार ६३ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

देशभरात आजपासून दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी

देशात मार्चपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे आताच्या घडीला देशात कोरोना विषाणूमुळे ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशीही माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. तर शुक्रवारी पार पडलेल्या परिषदेत भारताचा रिकव्हरी रेट हा २०.५७ टक्के इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशातील ८० जिल्हे असे आहेत, की तिथे मागील १४ दिवसांत एकही प्रकरण समोर आलेले नाही, असंही ते म्हणाले.

राज्यात शुक्रवार दिवसाअखेरपर्यंत  नव्या ३९४ रुग्णासह कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ६ हजार ८१७ पोहचला आहे. सरकारच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत १ लाख २ हजार १८९ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मागील २४ तासांत एकूण ५ हजार ८२० लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. 

मोदी सरकारच्या या तीन निर्णयांमुळे कोरोनाचा संक्रमण वेग आवाक्यात