पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नो समझौता', भारताकडून पाकला जशास तसे उत्तर

समझोता एक्स्प्रेस रद्द

पाकिस्तानला जशात तसे प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानदरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने रविवारी यासंदर्भातील घोषणा केली. यापूर्वी पाकिस्तानने रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय रेल्वेद्वारे दिल्ली ते अटारी आणि अटारीहून दिल्ली अशी रेल्वे सेवा सुरु होती. हिच रेल्वे पाकिस्तानमध्ये लाहोर ते अटारी दरम्यान धावत होती. प्रवासी अटारी स्थानकावर रेल्वे बदलत असत.  

कलम ३७०: भारताला मिळाली 'या' ८ देशांची साथ

उत्तर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोर आणि अटारी दरम्यान धावणारी समझौता एक्स्प्रेस 14607/ 14608 ही सेवा पाकिस्तानकडून रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते अटारी दरम्यान धावणारी लिंक एक्स्प्रेस 14001/14002 रद्द करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दोन प्रवाशांनी या रेल्वेचे तिकीट देखील बुक केले होते.  

पाकिस्तानने थार एक्स्प्रेस रोखली; भारताने दिले सडेतोड उत्तर

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत. भारताने घेतलेल्या या निर्णयानंतर पाकिस्तानने समझोता एक्स्प्रेस आणि थार एक्स्प्रेस रेल्वे सेवा बंद केली होती.