पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : विजय माल्याला पाहून भारतीय क्रिकेटप्रेमींच्या ‘चोर है..'च्या घोषणा

विजय माल्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच सामन्यादरम्यान विजय मल्ल्यानंही हजेरी लावली होती. भारतीय बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या विजय माल्याविषयी किक्रेटप्रेमींनी स्टेडिअम बाहेरच त्याचाविरोधात घोषणा द्यायला सुरू केली. सामना संपल्यानंतर माल्या मैदानाबाहेर पडताना भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ‘चोर है.. चोर है’ अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

विजय माल्या आई आणि मुलासह मॅच पाहण्यासाठी आला होता. विजय माल्या मैदानातून बाहेर पडल्यानंतर जमलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याच्याविरोधात घोषणा द्यायला सुरूवात केली. या गोंधळानंतर एएनआय या वृत्तसंस्थेनं माल्याला या घोषणाबाजीवर काय प्रतिक्रिया द्याल असा प्रश्न विचारला. त्यावर मी इथे सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावली आहे. या सर्व गोंधळामुळे माझी आई दुखावली जाऊ नये इतकीच आशा मी करतो असं माल्या म्हणाला. 

भारताच्या विजयानंतर माल्यानं  ट्विट करत विराट कोहली आणि संधाला शुभेच्छाही दिल्या. माझ्या मुलासोबत क्रिकेटचा सामना पाहताना मला आनंद झाला, भारतानं  हा सामना जिंकून माझा आनंद द्विगुणित केला असंही विजय माल्यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.