पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राजनैतिक संबंध तोडण्याचा पाकिस्तानने फेरविचार करावा'

भारत पाकिस्तान संबंध

भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असे मत भारताकडून व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्या राज्याच्या विकासासाठी आवश्यक निर्णय घ्यायला भारत मुक्त असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

सांगलीतील ब्रम्हनाळ येथे बोट उलटली; 9 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मिरचे विभाजन करून लडाख हा नवा केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार आहे. या सर्व निर्णयांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय बुधवारी घेतला. पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांना मायदेशी परतण्यास सांगण्यात आले आहे. तर भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना पुन्हा देशात परत बोलाविण्यात आले आहे. 

भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. भारताची राज्यघटना ही कायम स्वतंत्र होती, आहे आणि राहिल. भारतीय राज्यघटनेच्या कार्यकक्षेत येणाऱ्या गोष्टींमध्ये कोणत्याही दुसऱ्या देशाने लक्ष घालण्याचा प्रयत्न करू नये. तो प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. 

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला ऑनलाईन चोरीचा फटका, २३ लाख चोरले

परराष्ट्र खात्याने पाकिस्तानला त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले आहे. द्विपक्षीय चर्चेतून यावर मार्ग काढता येईल का, हा निर्णय भारताने राखीव ठेवला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India asks Pakistan to review decision to downgrade diplomatic ties says J and K status is internal matter