पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंदी महासागरात भारत-फ्रान्स नौसेनेचा युद्ध सराव

भारत-फ्रान्स यांचा युद्ध सराव

भारत आणि फ्रान्सने शुक्रवारी हिंदी महासागरातील नौसेनेचा थरारक युद्ध सराव पार पडला. चीनचा वाढता आर्थिक प्रभाव आणि दक्षिण चीन सागरात त्यांच्याकडून निर्माण केली जाणारी तणावपूर्ण परिस्थिती यामुळे भारत आणि फ्रान्सची चिंता वाढली आहे. 

फ्रान्सची कमान सांभाळणारे एडमिरल ऑलिव्हियर लेबास म्हणाले की, आम्हाला वाटते की आम्ही या क्षेत्रात अधिक स्थिरता आणू शकतो. आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या दृष्टिने हे महत्त्वाचे आहे. आशिया, युरोप आणि पश्चिम आशिया यांच्यातील मोठ्या प्रमाणातील व्यवसाय हा समुद्र मार्गाने होतो. दोन्ही देशातील सहा-सहा युद्धनौका युद्ध सरावात सहभागी झाल्या आहेत. 

फ्रान्स अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 2001 पासून सुरु झालेल्या युद्ध सरावातील आतापर्यंतचे हे सर्वात व्यापक सराव सत्र आहे. हिंदी महासागरात भारताला चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करावा लागत आहे. चीनने या क्षेत्रात आपल्या युद्धनौका आणि पानबुड्या तैनात केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर हा युद्ध सराव भारताच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.